Sero Survey In India : देशातील 68 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज, 40 कोटी लोकांना कोरोनाचा धोका कायम
Sero Survey India : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका समोर असताना सेरो सर्वेमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 67.6 टक्के लोकांमध्ये कोविड अॅन्टीबॉडीज आढळल्या आहेत. तर जवळपास निम्या लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मंगळवारी चौथ्या सेरो सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. हे सर्वेक्षण जून-जुलै दरम्यान करण्यात आले होते. 28,975 लोकांवर केलेल्या या सर्वेक्षणात 6 ते 17 वयोगटातील मुलांचा देखील समावेश होता. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 67.6 टक्के लोकांमध्ये कोविड अॅन्टीबॉडीज आढळल्या आहेत. म्हणजेच 67.6 टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यामुळे लोकसंख्येचा विचार केला तर अजूनही 40 कोटी लोकांमध्ये अद्यापही अँटीबॉडीज तयार झालेल्या नाहीत. म्हणजे या 40 कोटी नागरिकांना कोरोनाचा धोका कायम आहे.
या सर्वेक्षणात सामील झालेल्या 28,975 लोकांमध्ये 6 ते 9 वर्षे वयोगटातील 2,892 मुले, 10 ते 17 वर्षे वयोगटातील 5,799 मुले आणि 18 वर्षांवरील 20,284 लोकांचा समावेश आहे. आयसीएमआर महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सेरो सर्व्हेचे निकाल जाहीर करताना सांगितले की, सेरो सर्वेनुसार देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येत कोविड अँटीबॉडीज असून अजून 40 कोटी लोकसंख्येला कोरोनाचा धोका असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे. सर्वेक्षणात समाविष्ट 6 ते 17 वर्षे वयोगटातील अर्ध्याहून अधिक मुलांमध्ये अँटीबॉडीज देखील आढळली आहेत. म्हणजेच दुसऱ्या लाटेच्या संसर्गाचा परिणाम मुलांवरही झाला आहे.
![Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f11df49eed4e9cd2c7c2e312907f07091739729487045718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ganga River Water Purification Study : गंगेचं पाणी शुद्ध का राहते?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/759d6529a8158b33602010d32535fb28173937511446390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Himangi Sakhi Camp attacked : हिमांगी सखी यांच्या कॅम्पला घेराव घालत तरुणांकडून हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/96b976c8429411b5bd9663ce843347c71739092853576718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/53dbed56d06817cdca751f0a731aabb01739035978064718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![PM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/4cdfc3062939edcdfd61849d51eec19f1739028486776718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)