Gadchiroli Naxal : दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपवून दाखवू : पोलीस अधीक्षक नीलोत्पल
दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपवून दाखवू, असा विश्वास गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला. माओवाद्यांच्या ऐतिहासिक आत्मसमर्पणानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पालांची एबीपी माझाला खास मुलाखत दिली. गडचिरोलीत आता फक्त ४६ सशस्त्र माओवादी शिल्लक असल्याचा दावाही त्यांनी केला.
दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपून दाखवू.. गडचिरोलीत आता फक्त 46 सशस्त्र माओवादी शिल्लक... माओवाद्यांच्या ऐतिहासिक आत्मसमर्पणानंतर पोलीस अधीक्षक निलोत्पालांची एबीपी माझाला खास माहिती..
येणाऱ्या दोन वर्षाच्या आत गडचिरोली पूर्णपणे माओवाद मुक्त करून दाखवू असा विश्वास गडचिरोलीची पोलीस अधीक्षक निलोप्पल यांनी बोलून दाखवला आहे... आज देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात वरिष्ठ माओवादी कमांडरच्या पत्नीने पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यामुळे माओवाद्यांचे मनोबल कमालीचे तुटेल असे नीलोत्पल म्हणाले.. तारक्का गेल्या 38 वर्षांपासून सतत माओवादी चळवळीत सक्रिय होती आणि जंगलात राहून ती गडचिरोली मध्ये माओवाद्यांची संघटना तयार करणे, नव्या माओवाद्यांची भरती करणे असे महत्वाचे काम ही सांभाळत होती.. अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच तिला दंडकारण्य स्पेशल झोन कमिटी मध्ये पदोन्नती मिळाली होती.. आणि ती दंडकारण्य मेडिकल टीम ची प्रमुख म्हणून काम पाहत असल्याची माहिती ही पोलिस अधीक्षकांनी एबीपी माझा शी बोलताना दिली आहे... सामान्यपणे पोलिस आणि माओवाद्यांमध्ये होणाऱ्या चकमकीत महिला माओवादी कमांडर जास्त आक्रमक असतात.. त्यामुळे तारक्का चे आत्मसमर्पण अत्यंत महत्वाचे ठरणार असल्याचेही पोलीस अधीक्षक म्हणाले... २०२४ च्या सुरुवातीला गडचिरोली मध्ये सुमारे शंभर सशस्त्र माओवादी होते... तर वर्षाच्या अखेरच्या दिवशी ५० पेक्षा कमी सशस्त्र माओवादी गडचिरोलीत शिल्लक आहे.. त्यामुळे इथे दोन वर्षात गडचिरोलीतून माओवादाचा संपूर्णपणे बिमोड करून दाखवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.. दरम्यान १४ ऑगस्ट २०२० पासून एक ही पोलीस किंवा सीआरपीएफ जवान गडचिरोलीत शहीद झालेला नाही.. माओवाद्यांविरोधात एवढ्या ऑपरेशनल कारवाया केल्यानंतर गेल्या साडे चार वर्षात एक ही पोलीस शहीद न होणे आमच्यासाठी सर्वात जास्त जमेची बाजू असल्याचे निलोत्पाल म्हणाले...