Mumbai Local Train New Stations : लोकल प्रवाशांसाठी आनंदवार्ता! पश्चिम रेल्वे मार्गावर 7 नवी स्थानकं उभारणार, कुठे असणार स्टेशन? पाहा संपूर्ण यादी
Mumbai Local Train New Stations : पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विरार ते डहाणू मार्गावर येत्या दोन वर्षांत सात नवी स्थानकं उभारण्यात येणार आहेत.

Mumbai Local Train New Stations : मुंबईतील (Mumbai) लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाची सोय करणाऱ्या लोकल ट्रेनला (Local Train) ‘लाइफलाइन’ मानलं जातं. पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway line) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. विरार ते डहाणू मार्गावर (Virar to Dahanu route) येत्या दोन वर्षांत सात नवी स्थानकं (New Stations) उभारण्यात येणार असून, यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक सुलभ व सोयीचा होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MMRDA) या प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून, जून 2027 पर्यंत या कामाचं पूर्णत्व साधण्याचे उद्दिष्ट आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात एकूण अंदाजित खर्च 3578 कोटी रुपये इतका असून, यामध्ये मार्गाचं चौपटीकरण आणि नव्या स्थानकांची उभारणी समाविष्ट आहे.
सध्या 9 स्थानकं; आणखी सात स्थानकांची जोड (Mumbai Local Train New Stations)
विरार-डहाणू हा 64 किमी लांबीचा रेल्वे मार्ग सध्या नऊ स्थानकांनी युक्त आहे. वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर आणि वाणगाव ही प्रमुख स्थानकं असून, प्रवासी संख्येच्या तुलनेत स्थानकांची संख्या अपुरी पडत होती. प्रवाशांकडून या मार्गावर अधिक थांब्यांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या पार्श्वभूमीवर सात नव्या स्थानकांची योजना आखण्यात आली आहे.
कोणती असणार ही नवी स्थानकं? (Mumbai Local Train New Stations)
नवीन प्रस्तावित स्थानकांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
1 वाधीव
2 सरतोडी
3 माकूणसर
4 चिंतूपाडा
5 पांचाली
6 वांजरवाडा
7 बीएसईएस कॉलनी
ही स्थानकं उभारण्यासाठी आवश्यक तांत्रिक कामांना सुरुवात झाली असून, सध्या एकूण प्रकल्पाचे 41 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या स्थानकांमुळे विशेषतः डहाणू ते पालघर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा व वेगवान होणार आहे. गर्दीचा ताणही यामुळे काहीसा हलका होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऐतिहासिक पायाभूत सुविधा प्रकल्प (Mumbai Local Train New Stations)
मुंबईत उपनगरीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्या स्थानकांची उभारणी एका मार्गावर केली जात आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे सेवेचा दर्जा उंचावेलच, शिवाय मुंबईपासून दूर असलेल्या भागांचं शहराशी संलग्नता वाढेल. त्यामुळे या भागाचा विकास अधिक गतिमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























