एक्स्प्लोर
Dhule Protest : धुळे शहरात हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या, मूर्तीच्या कथित विटंबनेप्रकरणी मोर्चा
धुळे शहरात झालेल्या मूर्तीच्या कथित विटंबने प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेचा मोर्चा सुरू आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागातून मोर्चा मार्गस्थ होत असून अर्ध्या तासात मोर्चा आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात पोहोचणार आहे. या ठिकाणी महाआरती केली जाणार आहे... मोर्चाच्या मार्गावरील सर्व दुकाने व्यवसायिकांनी बंद ठेवली असून मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
आणखी पाहा


















