Sharad Pawar Birthday : पाहा 12 डिसेंबर आणि पवारांचं खास नात ABP MAJHA
मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आणि दमदार नेतृत्व म्हणजे शरद पवार... राजकारणातील चाणक्य असणाऱ्या पवारांचे डावपेच भल्याभल्यांना कळत नाहीत. त्यामुळेच पवार म्हटलं की काहीही होऊ शकतं अशी चर्चा कायम ऐकायला मिळते.. मात्र तेच पवार भावूक होणं, जुन्या आठवणीत रमणं हे दुर्मीळ... आज पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. निमित्त ठरलं त्यांच्या ८१व्या वाढदिवसाचं.. राष्ट्रवादी काँग्रेसने पवारांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत वरळी इथल्या नेहरु सेंटरमध्ये खास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचं सरप्राईज दिल्याबद्दल पवारांनी साऱ्यांचे आभार मानले. यावेळी १२ डिसेंबर हा दिवस आपल्या आयुष्यातील महत्त्वाचं दिवस असल्याचं सांगत पवारांनी खास नातं उलगडलं... राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आपल्या खास शैलीत पवारांना शुभेच्छा दिल्या.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
