एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar Crime : समृद्धी महामार्गावर हातात पिस्तुल घेऊन रिल बनवणं भोवलं

Chhatrapati Sambhajinagar Crime  : समृद्धी महामार्गावर हातात पिस्तुल घेऊन रिल बनवणं भोवलं सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काहीतरी स्टंट किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचं फॅड वाढत असून असाच एक स्टंट तरूणांना चांगलाच भोवलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) हातात पिस्तूल घेत 10-12 तरुणांना रील करण्याचा प्रताप त्यांना चांगलाच भोवलाय. सर्वसामान्य नागरिकांचे मनात भीती आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 5 जणांना पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे   छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तरुणांनी केलेला हा प्रकार अतिशय गंभीर असून या तरुणांवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हमीद शेख हबीब, शेख आफताब शेख कादर , शेख अशपाक आदिल तंबोली ऐजाज, सुमित सुभाष आवलकर अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.  समृद्धी महामार्गावर रील शूट करत पसरवली दहशत  दक्षिण भारतीय चित्रपटांमधल्या दृश्यांप्रमाणे हातात पिस्तूल घेऊन दहा-बारा तरुणांनी झूंडीत चालत येत समृद्धी महामार्गावर रील शूट करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलाय. दौलताबाद शिवारातील समृद्धी महामार्गावर बनवण्यात आली आहे. ती instagram वर पोस्ट करण्यात आली. ही रील व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून रीलच्या नादात समाज माध्यमांमधून सामान्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न कधी थांबणार असा सवाल उपस्थित होत आहे.   रीलचा जीवघेणा खेळ कधी थांबणार समृद्धी महामार्गावर मध्यभागी दहा-बारा तरुणांनी गॉगल घालत, हातात पिस्तूल घेत झुंडीत चालत येऊन हिल बनवण्यात आल्याचे दिसत असून त्याचा व्हिडिओ ही व्हायरल झाला आहे. याआधीही शहरात रील शूट करण्याचा नादात तरुणीला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.  रील काढताना अपघात, Accelerator दाबला अन् कार थेट दरीत श्नेता आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे (वय 25 रा.हनुमान नगर)  हे छत्रपतीसंभाजीनगर   येथून  सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले.  या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनवतांना तिने मित्राला सांगितले की,  मीपण कार चालवून बघते. रिव्हर्स गिअर पडून,एक्सलेटरवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन  खाली गेली यामध्ये या युवतीचा मृत्यू झाला. सुलीभंजन येथील दत्त मंदिराराचा परिसर विहंगम असून,पावसाळ्यात तो निसर्ग सौंदर्यांने अधिक खुलतो त्यामुळे भाविक ,पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. अशातच हे दोघेजण गुरुवारी (ता.17 जून) फिरायला आले. मोबाईलवर रिल्स बनवित असताना घात झाला. मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती अशी चर्चा होती. 

बातम्या व्हिडीओ

MNS Protest Nashik : नाशिकमध्ये 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, मनसेकडून आंदोलन
MNS Protest Nashik : नाशिकमध्ये 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, मनसेकडून आंदोलन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मेरी मर्जी..  सदावर्ते दाम्पत्याचा नाद खुळा; कॅरेबियन लूकमध्ये राजश्री पाटील
मेरी मर्जी.. सदावर्ते दाम्पत्याचा नाद खुळा; कॅरेबियन लूकमध्ये राजश्री पाटील
Nashik Rain Update : गोदामाई पुन्हा खळाळली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
Nashik Rain Update : गोदामाई पुन्हा खळाळली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
थायरॉईडचा त्रास होण्यामागं आहेत ही 4 कारणं, हा आजार बरा होऊ शकतो का? वाचा A टू Z माहिती
थायरॉईडचा त्रास होण्यामागं आहेत ही 4 कारणं, हा आजार बरा होऊ शकतो का? वाचा A टू Z माहिती
मोठी बातमी! जगातला दुसरा सर्वांत मोठा हिरा सापडला, फोटो पाहून चकित व्हाल
मोठी बातमी! जगातला दुसरा सर्वांत मोठा हिरा सापडला, फोटो पाहून चकित व्हाल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MNS Protest Nashik : नाशिकमध्ये 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, मनसेकडून आंदोलनDevendra Fadnavis Full Speech : तुमच्या तोंड्याला पट्याच बऱ्या, कारण तुम्ही अराजक निर्माण करताPune Helicopter Crash : मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलंABP Majha Headlines :  3 PM : 24 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मेरी मर्जी..  सदावर्ते दाम्पत्याचा नाद खुळा; कॅरेबियन लूकमध्ये राजश्री पाटील
मेरी मर्जी.. सदावर्ते दाम्पत्याचा नाद खुळा; कॅरेबियन लूकमध्ये राजश्री पाटील
Nashik Rain Update : गोदामाई पुन्हा खळाळली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
Nashik Rain Update : गोदामाई पुन्हा खळाळली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
थायरॉईडचा त्रास होण्यामागं आहेत ही 4 कारणं, हा आजार बरा होऊ शकतो का? वाचा A टू Z माहिती
थायरॉईडचा त्रास होण्यामागं आहेत ही 4 कारणं, हा आजार बरा होऊ शकतो का? वाचा A टू Z माहिती
मोठी बातमी! जगातला दुसरा सर्वांत मोठा हिरा सापडला, फोटो पाहून चकित व्हाल
मोठी बातमी! जगातला दुसरा सर्वांत मोठा हिरा सापडला, फोटो पाहून चकित व्हाल
कथेसाठी 20,000 भाविक जमले, धो धो पाऊस आला; प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम रद्द, भक्तांना आवाहन
कथेसाठी 20,000 भाविक जमले, धो धो पाऊस आला; प्रदीप मिश्रा यांचा कार्यक्रम रद्द, भक्तांना आवाहन
Raj Thackeray: लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका, 'लाडकी बहीण योजने'बाबतही राज ठाकरेचं मोठं विधान
लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका, 'लाडकी बहीण योजने'बाबतही राज ठाकरेचं मोठं विधान
Raj Thackeray : 'शरद पवारांनीच फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं, जाती-जातीत विषही कालवलं'; राज ठाकरेंचा गंभीर आरोप
'शरद पवारांनीच फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं, जाती-जातीत विषही कालवलं'; राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Jalna Accident: अंगावर वितळलेले लोखंड पडून 22 जखमी, जालन्यातील औद्योगिक वसाहतीत विस्फोट, मजूरांवर उपचार सुरु
अंगावर वितळलेले लोखंड पडून 22 जखमी, जालन्यातील औद्योगिक वसाहतीत विस्फोट, मजूरांवर उपचार सुरु
Embed widget