एक्स्प्लोर
Chandrapur Land Dispute | परमेश्वर Meshram आत्महत्या: कुटुंबियांनी स्वीकारला मृतदेह, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
चंद्रपूरमधून परमेश्वर मेश्राम यांच्या संदर्भातली ही बातमी आहे. कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह आता स्वीकारलेला आहे. एबीपी माझाने या संदर्भातली बातमी दाखवलेली होती. प्रशासनाने योग्य ती पावले टाकली आहेत आणि त्याचा परिणाम आता दिसत आहे. परमेश्वर मेश्राम यांच्या आत्महत्येप्रकरणी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांच्या आत संपूर्ण प्रकरणाचा तपास करून ही जमीन कायदेशीर मालकाच्या नावे करण्यात येईल असा आदेश जारी केला आहे. भद्रावती तहसील कार्यालयाच्या मार्फत हा आदेश जाहीर करण्यात आलेला होता. मात्र, विवादित शेतीतला साडे तीन एकर भाग आजोबांच्या नावाने होणार आहे. त्यामुळे वारसांना अतिशय कमी जागा मिळेल अशी पीडित कुटुंबीयांची भीती आहे. पीडित कुटुंबीयांनी धानोरकरांच्या ताब्यातली जमीन लवकरात लवकर परत देण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कुटुंबाच्या मनात जमिनीच्या वाटपाबद्दल चिंता आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
विश्व
भारत
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























