एक्स्प्लोर
Buldhana ST Worker : बसेस सोडून नातेवाईकांकडे मुक्कामाला, मेहकर आगाराचे 11 चालक-वाहक निलंबित
मुक्कामी बसेस सोडून नातेवाईकांकडे मुक्कामाला जाणे भोवले
मेहकर आगाराचे 11 चालक, वाहक तडकाफडकी निलंबित
सिंदखेडराजा मुक्कामी असलेल्या बसेस वाऱ्यावर सोडून आपल्या नातेवाईकांच्या घरी मुक्कामाला जाणे मेहकर आगारातील ११ वाहक व चालक यांना चांगलेच अंगलट आले आहे. मेहकर आगार व्यवस्थापका मधील पाहणी पथकाने सिंदखेडराजा येथे मुक्कामी असलेल्या या बसेसची अचानक रात्रीच्यावेळी तपासणी केली असता, हे चालक व वाहक आढळून आले नाहीत. त्यामुळे या सर्व चालक व वाहकांना एसटी महामंडळाने तडकाफडकी निलंबीत केले आहे. या कारवाईने एसटी महामंडळाच्या चालक व वाहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आणखी पाहा























