Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
बीड हत्या प्रकरण- कुठला ही आरोप धनंजय मुंडेवर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचे कोणतेच प्रयोजन नाही. कारण यात राजकारण आहे. आरोपी हा आरोपी असतो, तो कोणाचा मित्र आहे, नातलग आहे, याला महत्व नाही. वाल्मिक कराडला शभंर टक्के अटक होणार यात कोणतीही शंका बाळगू नये. रिफायनरी- कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्या पुर्वी त्यातील वस्तुस्थिती जाणून घेतली पाहीजे. या पुर्वी एनराॅन मुळे आंबा, काजू मासेमारीवर परीणाम होणार म्हणून सांगितल गेलं. मात्र तस काहीच झाल नाही. त्यामुळे जर ही ग्रीन रिफायनरी होणार असेल आणि त्यातून प्रदुषण होणार नसेल तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहीजे. ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहीजे. चिपी विमानतळावरून मुंबई विमानसेवा बंद- सिंधुदुर्ग पुणे विमानसेवा सुरू आहे. मात्र सिंधुदुर्ग मुंबई ही विमानसेवा बंद आहे. उडान योजनेतून ही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. कारण कोकणातील लोकांचा मुंबईशी संबंध जास्त येतो. त्यामुळे इतर कंपन्यांची विमानसेवा सुरू करता येईल का यासाठी प्रयत्न करणार.