एक्स्प्लोर
Vinayak Mete : विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार, पोलिसांची आठ पथकं कार्यरत
Vinayak Mete Accident News : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
बीड
...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारण
Manjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहन
Walmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEO
Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement