(Source: ECI | ABP NEWS)
Omicron : 'ओमिक्रॉन'पासून सावध राहा : WHO, भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली
Omicron variant : दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटनं (B.1.1.529) जगाला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमिक्रॉन व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे. ओमिक्रॉन हा धोकादायक व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन होतो . याशिवाय सुरुवातीच्या पुराव्यांवरून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले आहे. नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगभरातील देश सतर्क झाले असून हवाई वाहतूकीवर निर्बंध लावले आहेत. भारत, अमेरिकासह सर्वच देशांनी तयारी सुरु केली आहे. जगभरातील देश ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंतेत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत काही सुचना जारी करण्यात आल्या आहेत.



















