(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amir Khan चा लालसिंग चढ्ढा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय , वादानंतर आमिर आणि राहुलचं स्पष्टीकरण
आमिर खानचा लालसिंग चढ्ढा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि या चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली म्हणून गायक राहुल देशपांडेही टीकेचं लक्ष्य बनलाय. आमिर खाननं देशातल्या असंहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करून देश सोडण्याबाबत वक्तव्य काही वर्षांपूर्वी केलं होतं. त्यावरून वादही झाला होता. या वादानंतर प्रथमच प्रदर्शित झालेल्या त्याच्या लालसिंग चढ्ढा या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची भाषा काही संघटनांनी केलीय. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असताना हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर लालसिंग चढ्ढा चित्रपटाला काही संघटनांकडून विरोध होतोय. या चित्रपटाच्या प्रीमियर शोला गायक राहुल देशपांडे विशेष निमंत्रित होता. त्यानंतर चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट राहुल देशपांडेनं लिहिली. त्यावरून टीकेचं लक्ष्य झाल्यानंतर राहुल देशपांडेनं स्पष्टीकरण दिलंय.