एक्स्प्लोर

फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली

Sanjay Raut on Eknath Shinde : सध्याच्या दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारचे रुसवे फुगवे करण्याची कोणाची हिंमत आहे का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे असलेले मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. तर राज्याच्या गृहखात्यावरुन भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena Shinde Faction) जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होऊ शकतात, असे ट्विट केले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या रुसवे फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती असल्याचा संशय व्यक्त केलाय.  

संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली. यावर संजय राऊत म्हणाले की, राज्यपालांकडे अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. दहा दिवसानंतर पूर्ण बहुमत असलेले पक्ष राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही. आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाही. राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी अद्याप निमंत्रित दिलेलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाच तारखेला शपथविधीची तारीख जाहीर करतात. आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते, हा काय प्रकार सुरू आहे? या ठिकाणी आम्ही असतो आणि इतका उशीर झाला असता तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असती, असे त्यांनी म्हटले. 

अजित पवार आणि शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न

आझाद मैदानावरील पाहणी करायला फक्त भाजपचे लोक गेले होते, यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मुळात ती खरी शिवसेना नाही. ते डुप्लिकेट प्रॉडक्ट असल्यामुळे यापुढे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील. अडीच-तीन वर्षांपूर्वी त्यांना यासाठी गोंजारण्यात आले की, आमची मूळ शिवसेना फोडायची होती. महाराष्ट्र कमजोर करायचा होता. त्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं. पण, आता त्यांना कळेल की, भारतीय जनता पक्ष काय आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात तुफान भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी यावेळी भाजपवर केला.  

जे सरकार येईल ते विनोदी 

काल अजित पवार दिल्लीत होते. त्यांनी अनेक भेटीगाठी गुप्तपणे घेतल्या. सरकार महाराष्ट्रात स्थापन होत आहे आणि हे अनेक नेते दिल्लीत फिरत आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाही. अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन होणार आहे तो एक फार मोठा विनोद असेल. हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवून येत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. 

लोकशाही मार्गाने मतदान घेणाऱ्यांना धमक्या 

संजय राऊत पुढे म्हणाले की, ज्यांनी मतदान केले आहे त्यांचा निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाही. गावागावात लोक फेर मतदान घेत आहेत. यावर निवडणूक आयोगाने भाष्य केले पाहिजे. आज माळशिरसमधील मारकडवाडी गावात 144 कलम लावलाय. लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवर 144 कलम लावून घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. अजून राज्यात सरकार यायचे आहे.  मारकडवाडीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झालाय. पण, लोकांना वाटतं की विजयी उमेदवाराला जी मतं मिळाली ती कमी मत आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जिंकून सुद्धा ते फेर मतदान घेत आहेत. कारण मतदान कमी झाल्याचे दिसत आहे, असे त्यांनी सांगितले. 

दिल्लीतली कुठल्यातरी महाशक्तीकडून कार्यक्रम

एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होऊ शकतात, असे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा कट आहे, असेही त्यांनी म्हटले. याबाबत संजय राऊत म्हणाले की, देशामधील विरोधी पक्ष संपवण्याचा कट सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध एकनाथ शिंदे यांचे जे रुसवे फुगवे चालले आहेत. त्यामागे मला शंका आहे की, दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करत आहे. दिल्लीतल्या एखाद्या महाशक्तीशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचे धाडस करू शकत नाही. सध्याच्या दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारचे रुसवे फुगवे करण्याची कोणाची हिंमत आहे का? ज्या लोकांनी अडीच-तीन वर्षांपूर्वी ईडी, सीबीआय आणि दिल्लीतल्या गृह मंत्रालयाला घाबरून शिवसेना फोडली आणि पळून गेले, त्यांना तीन वर्षात असं कुठलं टॉनिक मिळालं की, ते दिल्लीला डोळे वटारून दाखवत आहे. दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रातला हा खेळ खेळत आहे, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

आणखी वाचा 

आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सिद्ध करुन दाखवलंय, कशा रितीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, दीपक केसरकरांचं सूचक वक्तव्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SA 1st T20 Team India Playing XI: 7 खेळाडू OUT, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल IN...; द. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
7 खेळाडू OUT, सूर्यकुमार-शुभमन IN...; द. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Home Loan Interest rate: होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेपो रेट कमी होताच 'या' 4 बँकांनी व्याजदर घटवला
होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेपो रेट कमी होताच 'या' 4 बँकांनी व्याजदर घटवला
Gaurav Khanna Bigg Boss 19 Winner Instagram Post: 'ते विचारत राहिले, जीके काय करेल? अन् मी...'; 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट
'ते विचारत राहिले, जीके काय करेल? अन् मी...'; 'बिग बॉस 19' जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट
Pune crime news: पुण्यातील पोलीस कर्मचारी बेपत्ता, लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस, म्हणाला,'दीदी तुला पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'
पुण्यातील पोलीस कर्मचारी बेपत्ता, लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस, म्हणाला,'दीदी तुला पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'

व्हिडीओ

Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs SA 1st T20 Team India Playing XI: 7 खेळाडू OUT, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल IN...; द. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
7 खेळाडू OUT, सूर्यकुमार-शुभमन IN...; द. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी अशी असेल भारताची Playing XI
Home Loan Interest rate: होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेपो रेट कमी होताच 'या' 4 बँकांनी व्याजदर घटवला
होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेपो रेट कमी होताच 'या' 4 बँकांनी व्याजदर घटवला
Gaurav Khanna Bigg Boss 19 Winner Instagram Post: 'ते विचारत राहिले, जीके काय करेल? अन् मी...'; 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट
'ते विचारत राहिले, जीके काय करेल? अन् मी...'; 'बिग बॉस 19' जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट
Pune crime news: पुण्यातील पोलीस कर्मचारी बेपत्ता, लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस, म्हणाला,'दीदी तुला पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'
पुण्यातील पोलीस कर्मचारी बेपत्ता, लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस, म्हणाला,'दीदी तुला पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'
Rupali Patil On Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off: स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; आता रुपाली पाटलांची एन्ट्री, नेमकं काय म्हणाल्या?
स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; आता रुपाली पाटलांची एन्ट्री, नेमकं काय म्हणाल्या?
Manasi Naik Ex Husband Second Marriage: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या EX नवऱ्यानं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा PHOTOs
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या EX नवऱ्यानं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा PHOTOs
Tukaram Munde Maharashtra Winter Session Nagpur 2025: तुकाराम मुंढे यांना निलंबित करा; भाजपाचे आमदार हिवाळी अधिवेशनात करणार मागणी, नेमकं कारण काय?
तुकाराम मुंढे यांना निलंबित करा; भाजपाचे आमदार हिवाळी अधिवेशनात करणार मागणी, नेमकं कारण काय?
Dhurandhar Box Office Collection Day 3: रणवीरच्या 'धुरंधर'नं  बॉक्स ऑफिसवर लावली आग; 'सैयारा', 'कांतारा 1' सर्वांना पाणी पाजलं
रणवीरच्या 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवर लावली आग; 'सैयारा', 'कांतारा 1' सर्वांना पाणी पाजलं
Embed widget