एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू

Submarine Collides With Fishing Boat : नौसेनेच्या पाणबुडी अपघातात मासेमारी बोटीवरील दोन खलाशांचा मृत्यू झाला, या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Goa Navy Submarine Accident : नौसेनेच्या पाणबुडीला मासेमारी बोटीची धडक बसून 21 नोव्हेंबरला झालेल्या अपघातप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्याच्या समुद्राजवळ झालेल्या नौसेनेच्या पाणबुडी अपघातात मासेमारी बोटीवरील दोन खलाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातात नौसेनाच्या पाणबुडीचं देखील कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या प्रकरणी मासेमारी बोटीवरील तांडेलविरोधात यलो गेट पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात नेमका घडला कसा?

कर्नाटक येथील कारवार बंदरातून भारतीय नौसेनेची आय.एन.एस. करंजा ही पाणबुडी 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पैरीस्कोप डेप्थ मेंटेन करुन गोव्याच्या तटावरुन वेगाने जात होती. दरम्यान पाणबुडीच्या उजव्या बाजूने एफ. व्ही. मारथोमा ही एक मासेमारी बोट दोन ते तीन किलोमीटर अंतरावर  दिसून आली, सदर मासेमारी बोट एका जागेवर उभी होती. प्रकाश  फार अंधुक असल्यामुळे समोरची बोट स्पष्ट दिसत नव्हती.

दोन खलाशांचा मृत्यू

दोन्ही बोटींमध्ये सुरक्षित अंतर राखून एन.एस. करंजा पाणबुडीने दिशा बदलून आपला वेग कायम ठेवला. पाणबुडीने मासेमारी बोटीपासून वाचण्याचे सर्व प्रयत्न करुनही ती मासेमारी बोट पाणबुडीला धडकली आणि समुद्रात पलटी होऊन बुडाली. ही धडक गोव्याजवळील अरबी समुद्रात रात्रीच्या सुमारास झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मासेमारी बोटीवरील 2 खलाशांचा मृत्यू झाला. या अपघातात बेपत्ता झालेल्या खलाशांचा मृतदेह 28 नोव्हेंबरला सापडला. यानंतर हे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन जेजे रुग्णालयात पाठवले असून मृतदेहाची ओळख पटवण्यात येत आहे.

नौसेनेने दिलेल्या माहितीनुसार...

भारतीय नौसेनेचे कार्यकारी अधिकारी कमल प्रीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मासेमारी बोट  ऑटोमेटीक आयडेन्टीफिकेशन सिस्टम काम  करत नव्हते. त्यामुळे मासेमारी नौकेचा वेग, स्थान, दिशा, नाव समजून येत नव्हते. एफ. व्ही. मारथोमा या बुडालेल्या बोटीवरील दोन हरवलेल्या खलाशांची शोध मोहिम राबवताना दोन्हीही खलाशांचे मृतदेह मिळून आले. या अपघातात नौसेनेच्या पाणबुडीचे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान झाले. 11 खलाशांच्या दुखपतीला आणि दोन खलाशांच्या मृत्यूला कारणीभूत असल्यामुळे मासेमारी बोटीवरील तांडेल विरुद्ध यलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यलोगेट पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत          

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
Goa : धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi Voting : प्रशासनाचा विरोध डावलून आज मारकडवाडीत मतदानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
Goa : धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
Embed widget