एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात

नागपुरात काँग्रेसची लढाई आता हमरी तुमरीवर! नाना पटोलेंवर बंटी शेळके यांच्या गंभीर आरोपानंतर नाना पटोलेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचे पदाधिकारी उतरले मैदानात....

Nagpur:बंटी शेळके आता तरी थांबा, नाना पटोले विरोधात तुमचे वक्तव्य थांबवा, अन्यथा तुम्हाला जशास तसा उत्तर देऊ, अशा शब्दात नागपूरच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंटी शेळके यांना इशारा दिला आहे. नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आणि राज्यात झालेल्या काँग्रेस पक्षाच्या पराभवाचा खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या डोक्यावर फोडणे सुरू केले आहे.नाना पटोले आरएसएसचे एजंट असून त्यांनी जाणून बुजून राज्यात काँग्रेसला पराभूत होऊ दिले, असा बंटी शेळके यांचा आरोप आहे.सोमवारी बंटी शेळके यांनी काँग्रेस कार्यालयात शिरून बैठक घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयाला कुलूप लावल्यामुळे बंटी शेळके यांनी फूटपाथवरच बैठक घ्यावी लागली होती. त्यावेळी ही बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत बंटी शेळके यांना गप्प राहण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बंटी शेळकेंना दिली तंबी

तुम्हाला जी तक्रार करायची आहे, ती पक्षाच्या अंतर्गत बैठकीत करा, प्रसारमाध्यमांमध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष आणि शहराध्यक्ष च्या विरोधात बोलले तर आम्ही पण गप्प बसणार नाही. नाना पटोले विरोधात बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.बंटी शेळके यांना मिळालेले 80 हजार मतं काँग्रेस कार्यकर्त्यांची मेहनत आहे त्यामुळे मध्य नागपूर मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं नाही असा खोटा आरोप शेळके यांनी करू नये असंही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा म्हणणं आहे... बंटी शेळकेच्या वागणुकीमुळे नागपुरातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नाराज होते. बंटी शेळके खुद्द सर्वात निष्क्रिय नेते असून नगरसेवक म्हणून काहीच काम केले नाही मग लोकं त्याला मतदान कसं करतील असा सवालही काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

बंटी शेळके काय काय म्हणाले होते? 

हस्तक्षेप करून मला उमेदवारी देण्यात आली. हे नाना पटोले यांना पटले नाही. त्यामुळे आपल्या विश्वासातील काही नेते आणि कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांना त्यांना मदत पुरवली. याशिवाय, बंटी शेळके यांनी नाना पटोलेंवर उमेदवारी विकल्याचाही आरोप केला होता. बंटी शेळके म्हणाले, राहुल गांधी यांनी उमेदवारी दिल्याने मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो. पंजा चिन्हावर लढलो. असे असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात एकट्याच्या बळावर निवडणूक लढावी लागली. प्रचारात संघटनेची मदत झाली नाही. पटोलेंनी या मतदारसंघात प्रचारासाठी नेत्यांना पाठवले नाही. ते स्वतः ही प्रचारासाठी आले नाही. कुठलीही मदत केली नाही, अशा शब्दात बंटी शेळके यांनी नेत्यांच्या उपस्थितीत पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi Voting : प्रशासनाचा विरोध डावलून आज मारकडवाडीत मतदानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
Embed widget