Vidarbha Lok Sabha Elections Exit Poll : विदर्भात कुणाचा झेंडा फडकणार? जनतेला काय वाटतं?
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होत आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर लगेच वेगवेगळ्या संस्था एक्झिट पोलच्या माध्यमातून या निवडणुकीचा संभाव्य निकाल व्यक्त करतील. कोण कोणत्या जागेवरून जिंकणार? किती मतांच्या फरकाने जिंकणार? याबाबतचे अंदाज या एक्झिट पोलमध्ये सांगितले जातील.
मतदान झाल्यांतर वेगवेगळ्या संस्थांनी देशभरात सर्वेक्षण केलेले आहे. याच सर्वेक्षणाच्या आधारे हे एक्झिट पोलचे आकडे सांगितले जातात. निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीचा निकाल प्रत्यक्ष जाहीर होण्याआधीच लोकांचा कल काय होता, लोकांच्या भावना काय होत्या हे सांगण्याचा उद्देश या एक्झिट पोलच्या माध्यमातून केला जातो.
शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी आज मतदान झालं. निवडणुकीची वेळ संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्था एक्झिट पोलचे आकडे जाहीर करतील. या एक्झिट पोलच्या माध्यमातून देशात कोणाची सत्ता येणार, कोण कोणत्या जागेवरून जिकंणार याचा अंदाज व्यक्त केला जाईल. हे आकडे समोर येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेल आहेत.