(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Muddyache Bola:संगमनेमध्ये कुणाची हवा? जनता कुणाला कौल देणार? मुद्दाचं बोला थेट संगमनेरहून #abpमाझा
Muddyache Bola:संगमनेमध्ये कुणाची हवा? जनता कुणाला कौल देणार? मुद्दाचं बोला थेट संगमनेरहून #abpमाझा
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात आठ वेळा निवडून येत विक्रम केला आहे... यावेळी नवव्यंदा ते निवडणुकीला सामोरे जात असून तालुक्याबरोबर राज्याचा दौरा देखील त्यांना करावा लागतोय... बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारासाठी त्यांचं कुटुंब देखील मतदार संघात दौरा करत असून जयश्री थोरात या देखील आपल्या वर्षभराच्या मुलाला घरी ठेवून वडिलांसाठी मतदार संघात भेटीगाठी व संपर्क अभियान राबवत आहे... संगमनेर तालुक्यातील वाड्यावर वस्त्यांवर जात मतदारांशी संवाद साधत जयश्री थोरात आपल्या वडिलांच्या मताधिक्यासाठी प्रयत्न करत आहे.. प्रचार दौऱ्या दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी..संगमनेर तालुका थोरात साहेबांचा परिवार आहे.. पूर्ण तालुका एकजूट झाला असून मतदारांनीच थोरात साहेबांसाठी प्रचाराची मोहीम हाती घेतली आहे.. एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केल्याचं मला दिसून येत आहे..लोकसभेत पराभव दिसल्यानंतर लाडकी बहीण योजना आणण्यात आली.. यांचं हिताचं नव्हे तर मताच राजकारण आहे हे आता महिलांना देखील समजून आल आहे... त्यामुळे त्याचा प्रभाव मतदारांवर पडणार नाही... जे सरकार महिलांचा अपमान होऊ देतं अत्याचार होऊ देतं.. त्यांच्या सुरक्षेचा काय केवळ पंधराशे रुपये देऊन चालणार नाही..रोज सकाळीच बाहेर पडते व रात्री घरी जाते त्यामुळे मुलाची भेट होत नाही आठवण येते मात्र आता आठवडाच राहिलाय त्यानंतर पूर्णवेळ त्यालाच देणार आहे... आठ दिवस तो मला माफ करेल.. 17 तारखेला प्रियंका गांधी शिर्डीत येत आहे... त्यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी लोक देखील उत्सुक आहेत... निश्चितच लोकांना देखील आता त्यांना ऐकायचा आहे...