Uttar Pradesh निवडणुकांसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर, विद्मान आमदारांपैकी 63 जणांना तिकीट
उत्तर प्रदेश निवडणुकांची घोषणा होताच भाजपाला गळती लागली. आतापर्यंत तीन मंत्र्यांसह 16 जणांनी भाजपला नारळ दिलाय. या स्थितीत भाजपने निवडणुकीसाठी आज 107 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत सध्या आमदार असलेल्या 83 जणांपैकी 63 जणांना तिकीट दिले असून तरुण, महिला आणि समाजासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्यांना तिकीट देण्यात आलं आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात होते पण ते आता गोरखपूरमधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना प्रयागराज जिल्ह्यातील सिराथू येथून उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 57 जागांवर उमेदवार जाहीर केले असून अलीगढ मतदारसंघासाठी लवकरच उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.























