एक्स्प्लोर
Exam Results : SSC HSC परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून, निकालाला विलंब?
कायम विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी १०० टक्के अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्यामुळे १० वी आणि १२ वीच्या निकालाला उशीर होण्याची शक्यता आहे. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीनं उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. विना अनुदानित शाळांसाठी प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान मिळावं आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवा संरक्षण मिळावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
आणखी पाहा


















