एक्स्प्लोर
CBSE Exams : सीबीएसई बोर्डाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
सीबीएसई बोर्डाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय.. सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरु होणार असून 24 मे रोजी संपणार आहे.. तर बारावीची परीक्षा देखील २६ एप्रिलपासूनच सुरु होणार आहे आणि 15 जून रोजी संपणार आहे. सीबीएसईच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा उर्वरित 50 टक्के अभ्यासक्रमासाठी घेतली जाईल. प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल. दहावी आणि बारावीच्या या परीक्षा सकाळी साडेदहापासून सुरू होतील आणि परीक्षा फक्त एका शिफ्टमध्ये घेतली जाईल.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण


















