एक्स्प्लोर
"फोन टॅपिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणार" - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप करत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल पत्रकार परिषदेत जाहीर केला. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आपण केंद्रीय गृहसचिवांना भेटून मागणी करणार आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असं फडणवीस म्हणाले. तसेच बदल्यांचं रॅकेट बाहेर आणणाऱ्या रश्मी शुक्लांना साईडपोस्टिंगला टाकलं. सुबोध जयस्वाल यांनीही कारवाईची मागणी केली तीही झाली नाही. त्यामुळे ते प्रतिनियुक्तीवर गेले.. उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी विचारला.
आणखी पाहा























