Devendra Fadnavis : Devendra Fadnavis आणि Nitin Gadkari यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून टीका सुरू आहे, तर सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.























