(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Bajaj Passes Away : बजाज चेतक बनली होती प्रत्येक घराची शान, राहुल बजाज यांनी तयार केली होती खास स्कूटर
Rahul Bajaj Passes Away : भारतातील प्रमुख उद्योगपती राहुल बजाज (Rahul Bajaj ) यांचे आज निधन झाले आहे. राहुल बजाज यांनी बजाज चेतक ही स्कूटर बनवली होती. भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांनी या स्कूटला चांगला प्रतिसाद दिला होता.
Rahul Bajaj Passes Away : भारतातील प्रमुख उद्योगपती राहुल बजाज (Rahul Bajaj ) यांचे आज निधन झाले आहे. बजाज ग्रुपचे ते माजी चेअरमन होते. राहुल बजाज हे आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमधे मागील दोन महिन्यांपासून दाखल होते. आज दुपारी अडीच वाजता वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1965 ला राहुल बजाज हे बजाज ग्रुपचा एक भाग बनले. त्यानंतर त्यांनी बजाज ग्रुपला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवले. राहुल बजाज यांच्या कार्यकाळात कंपनीची उलाढाल 7. 2 कोटींपासून 12 हजार कोटींपर्यंत पोहोचली होती. फोर्ब्सच्या अहवालानुसार राहुल बजाज यांची संपत्ती 820 कोटी रुपये आहे.
राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. महात्मा गांधी यांच्याबरोबर त्यांचे निकटचे संबंध होते. ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीचं मोठं योगदान आहे. राहुल बजाज हे देशातील यशस्वी उद्योगपतींपैकी एक होते. 2006 ते 2010 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्यही होते.
चेतक स्कूटरची निर्मिती
बजाज समूह स्कूटर विकणारी देशातील आघाडीची कंपनी म्हणून उदयास आली होती. राहुल बजाज यांनी कंपनीचे नेतृत्व करत असताना बजाज चेतक नावाची स्कूटर बनवली. या स्कूटरला चांगली मागणी होती. भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांनी या स्कूटला चांगला प्रतिसाद दिला होता. त्यावेळी चेतक स्कूटर घरासमोर असणे म्हणजे त्या कुटुंबाजी वेगळी शान होती. 15 ते 20 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतरच ही स्कूटर मिळत होती.
राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखालीच कंपनीने 1972 मध्ये बजाज चेतक स्कूटरची निर्मिती केली. या स्कूटरची 2006 पर्यंत विक्री होत होती. महाराणा प्रताप यांच्या प्रसिद्ध घोड्यावरून या स्कूटरला चेतक हे नाव देण्यात आलं होतं.
राहुल बजाज हे बाजाज ग्रुपमध्ये जवळपास 50 वर्षं कार्यरत राहिले. राहुल बजाज चेअरमन झाल्यानंतर कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेतही विशेष ओळख निर्माण केली. त्यांनी 30 एप्रिल 2021 रोजी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला. राहुल बाजाज यांच्या अनुभवाच्या जोरावर कंपनीने चांगली प्रगती केली.
ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीचं मोठं योगदान आहे. राहुल बजाज हे स्वत: बहुआयामी होते. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल 2010 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. याबरोबरच त्यांना 'नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' ही पदवीही देण्यात आली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 2017 मध्ये बजाज यांना CII राष्ट्रपती पुरस्कारही प्रदान केला होता.
महत्वाच्या बातम्या