(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour With Sarita Kaushik : JP Nadda यांचं 'ते' वक्तव्य संघाला रुचलं नाही का?
लोकसभेच्या प्रचारादरम्यान भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी.. भाजपला आता संघाची गरज नाही, असं वक्तव्य केलं... एकीकडे त्यांना मिसकोट केले हे सांगितल्या गेले पण त्यानंतर भाजप-संघाच्या संबंधांविषयी सर्वांच्याच भूवया उंचावल्या.. खर तर मोहन भागवत ह्यांनी गेली १० वर्ष आपल्या प्रत्येक भाषणात केंद्रातील सरकारच्या कामाचे कौतुक केलेय ... काही निरीक्षणे हि नोंदवली असतील, काही सूचना केल्या असतील पण सार्वजनिक रित्या टीका नव्हती. पण निवडणुकीच्या निकालानंतर संघाकडून वारंवार होणाऱ्या टीका आणि नाराजीमुळे.. संघ आणि भाजपमध्ये आलबेल आहे का? हा प्रश्न साहजिकरित्या उपस्थित होतोय .. मात्र संघाच्या या भूमिकेला छेद देणारं वक्तव्य थेट अयोध्येतून आलं आहे.. राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी, आचार्य सत्येंद्र दास महाराजांनी.. इंद्रेश कुमार आपल्या अपयशाचं खापर भाजपवर फोडत असल्याचा, पलटवार केलाय.. पाहूयात..