Zero Hour | Raj Thackeray Ganga Statement | राज ठाकरेंचं 'ते' विधान, कुणाचं समर्थन, कुणाचा विरोध?
Zero Hour | Raj Thackeray Ganga Statement | राज ठाकरेंचं 'ते' विधान, कुणाचं समर्थन, कुणाचा विरोध?
राज ठाकरेंनी गंगा नदीच्या पाण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादांचा कुंभमेळा भरलाय. पिमरी चिंचवड मध्ये बोलताना राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील प्रकारांबाबत ठाकरी शैलीत टीका केली. शिवाय नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दाही उचलून धरला. त्यांच्या या वक्तव्यावरून आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. हे आमचे बाळा नांदगा इथे घेऊन आले काय छोटू मधन पाणी घेऊन आले. मी नाही पिणार. गंगे. पाणी भरलेला कमंडलू राज ठाकरेंनी असा नाकारला आणि वादाच्या नव्या प्रवाहाला वाट फुटली. गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपल्या इंजिनात हिंदुत्वाच पाणी भरू पाहणाऱ्या राज ठाकरेंनी पिंपरी चिंचवड मधल्या व्यासपीठावरून टीकेच्या वाफा सोडल्या. कुंभमेळ्या डुक्की पासून ते नदीच्या प्रदूषणापर्यंत अनेक मुद्द्यांवर राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत बॅटिंग केली. आमचे बाळा नांदगाव इथे घेऊन आले काय छोटू मधन पाणी घेऊन आले म म्हटल मी नाही पिणार. एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार मध्ये राजकपुरानी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणाबद्दल भाष्य करताच सत्ताधारी भाजपाने. राज ठाकरेंच्या वैचारिक प्रदूषणावर टीका करायला सुरुवात केली.
सगळे कार्यक्रम






























