मॅथ्यू हेडनची मुलगी भारतीय क्रिकेटपटूवर फिदा, नावही सांगितलं, म्हणाली, त्याच्यासाठी माझ्या हृदयात खास स्थान!
matthew hayden daughter grace hayden : मॅथ्यू हेडनची मुलगी भारतीय क्रिकेटपटूवर फिदा, नावही सांगितलं, म्हणाली, त्याच्यासाठी माझ्या हृदयात खास स्थान!

matthew hayden daughter grace hayden : ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांची मुलगी ग्रेस हेडन ही सध्या भारतात असून दिल्ली प्रीमियर लीग (DPL 2025) मध्ये स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम करत आहे. ग्रेस हेडन तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हिडीओंमध्ये दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंशी केलेल्या गप्पा मारतानाही पाहायला मिळत आहे. मात्र, ग्रेस हेडनने एका भारतीय क्रिकेटपटूबाबत असे काही सांगितले की तिच्या मनातील भावना सर्वांसमोर आल्याची चर्चा सुरु झाली आहे. मॅथ्यू हेडन यांच्या मुलीने भारतीय खेळाडू ऋषभ पंत तिच्यासाठी खूप खास असल्याचे सांगितले.
ग्रेस हेडनची ऋषभ पंतवर स्तुतीसुमने
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज मॅथ्यू हेडन यांची मुलगी ग्रेस हेडनला विचारले गेले की तिला के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यापैकी कोण आवडतो? त्यावर ग्रेस हेडनने ऋषभ पंतचे नाव घेतले. ग्रेस म्हणाली, “ऋषभ पंतसाठी माझ्या मनात एक खास जागा आहे.” पंतच्या कौतुकात तिने पुढे म्हटले, “इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत जखमी असूनही ऋषभने ज्या प्रकारे धैर्य दाखवले आणि फलंदाजीसाठी आला, त्याला सलाम आहे.”
पंतची चौथ्या कसोटीतली संस्मरणीय खेळी
ग्रेस हेडनने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऋषभ पंतच्या शानदार खेळीचा उल्लेख केला. पंतच्या पायाला चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात, 37 धावांवर फलंदाजी करताना दुखापत झाली होती आणि तो रिटायर्ड हर्ट झाला होता. पण नंतर गरज पडल्यावर पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असतानाही पंत लंगडत फलंदाजीसाठी आला आणि आवश्यक वेळी अर्धशतक झळकावले. पंतच्या या खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 358 धावा केल्या. अखेरीस भारताने इंग्लंडविरुद्धचा हा सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























