Zero Hour Bhaskar Jadhav | कोकणात का पडतेय जातीय समीकरणांची गरज?
नमस्कार, मी अमोल जोशी.
झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.
विषय आहे भास्कर जाधवांचा.
पण फक्त भास्कर जाधव यांच्यापुरता नाही.
विषय आहे त्यांनी ब्राम्हण समाजाबाबत केलेल्या विधानाचा.
पण फक्त त्या एका विधानापुरता नाही.
आणि
विषय आहे गुहागरमधील जातीय समीकरणं आणि त्यामागच्या राजकारणाचा...
पण फक्त गुहागरच्या राजकारणाचा नाही.
तर झालं असं..
गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुहागर दौरा केला.
या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर त्याच ठिकाणी भास्कर जाधवांनी पक्षाचा एक मेळावा घेतला.
या मेळाव्यात त्यांनी उपस्थितांना एक प्रश्न विचारला.
तो प्रश्न होता की तुम्हाला पुन्हा खोतकी हवीय का..
खोताच्या ओटीवर जाऊन बसायचंय का..
आता खोतकी हा विषय काही कुठल्या एका विशिष्ट समाजापुरता नाही.
वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या समाजाकडे खोतकी असते.
पण खोतकीबाबत बोलताना भास्कर जाधवांनी काही ब्राम्हण नेत्यांची नावं घेतली आणि वादाला सुरुवात झाली.
याला ब्राम्हण साहाय्यक संघानं आक्षेप घेत त्यांना पत्र दिलं.
त्यानंतर काल मुंबईतील शिवसेना भवनात आणखी एक मेळावा झाला.
त्यात ब्राम्हण समाज पाताळयंत्री असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आणि वाद अधिकच भडकला.
त्यानंतर ब्राम्हण समाजाकडून भास्कर जाधवांवर टीका सुरु झाली.
तर आपल्या भाषणाचा रोख हा गुहागरमधील बहुसंख्य ब्राम्हणांवरच होता, असं ठासून सांगत भास्कर जाधवांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचं सांगितलं.
गुहागरमधील कुणबी समाजाचा असणारा प्रभाव आणि भास्कर जाधवांचे कोकणातले सध्याचे प्रतिस्पर्धी, मग ते विनय नातू असोत किंवा उदय सामंत यांना जोडून हे विधान पाहिलं जाऊ लागलं.
या निमित्तानं महाराष्ट्रात वारंवार उद्भवणारे जातीय वाद, मतांच्या गणितांसाठी केला जाणारा जातींचा वापर अशा मुद्द्यांवर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत.
पण त्यापूर्वी पाहूया भास्कर जाधव आज नेमकं काय म्हणाले.
All Shows

































