Zero Hour : 'त्या' बारच्या अनधिकृत बांधकामावर बु़लडोझर
Zero Hour : 'त्या' बारच्या अनधिकृत बांधकामावर बु़लडोझर वरळी हिट अँड रन प्रकरणात आता मुंबई महानगर पालिका देखील अॅक्शन मोडमध्य़े आली. आरोपी मिहीर शाहने अपघाताच्या आधी जुहुमधील ज्या बारमध्ये दारू प्यायली होती त्या व्हाईस ग्लोबल तापस बार वर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. बारच्या इमारतीच्या एका बाजुला असलेल्या मोकळ्या जागेवर जागामालकाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलं होतं, बारच्या बाहेरील शेडचं बांधकाम अवैध असल्याची माहिती महानगरपालिकेनं दिली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हे अतिक्रमण हटवण्याचं काम करण्यात आलं. तिथला अनधिकृत भाग तोडण्यात आला. राज्य उत्पादक शुल्क विभागाने हा बार सील केला होता आता मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. याच व्हाईस ग्लोबल तापस बारच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी घेतलेला आढावा पाहुयात..