Zero Hour : जितेंद्र आव्हाडांकडून आंदोलनात मोठी चूक; भाजप, सेना, राष्ट्रवादीचं आंदोलन
बातमी आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या एका आंदोलनाची आणि आंदोलनाच्या उत्साहात त्यांनी केलेल्या एका मोठ्या चुकीची.. त्याचं झालं असं की शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश केला जाणार अशी बातमी दोन तीन दिवसांपूर्वी आली होती. त्यावरुन दोन गटही पडले होते. त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड महाड इथे पोहोचले. महाडमधील ज्या चवदार तळ्याचं पाणी पिऊन डॉक्टर बाबासाहेबांनी एकेकाळी मनुस्मृती ग्रंथ जाळत आंदोलन केलं होतं तिथेच डॉक्टर आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. या आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.. मात्र या आंदोलनादरम्यान डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या हातून एक मोठी चूक घडली..त्यांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर्स फाडले गेले.. डॉक्टर आव्हाड यांच्या हातून घडलेल्या या कृत्याविरोधात राज्यभरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपने रान उठवलं. त्यानंतर डॉक्टर आव्हाड यांनी झालेल्या चुकीबद्दल माफीही मागितली. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि २२ कार्यकर्त्यांविरोधात रायगडच्या महाड शहर पोलिस ठाण्यात एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बातमीसोबतच झीरो अवरमध्ये आज इथेच थांबुयात. उद्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटुयात.. तोवर पाहात राहा एबीपी माझा..