एक्स्प्लोर
Advertisement
Zero Hour Guest Center : मुंबईत मोदींचा रोड शोवरून ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर-प्रवीण दरेकर आमनेसामने
नाशिक: मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्यामुळे लोकांना तासनतास थांबावं लागतं, वाहतूक कोंडी होते, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात रोड शो केला होता. या रोड शो साठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले होते. मुंबई पूर्व उपनगर आणि ठाण्याला जोडणारा लाल बहादूर शास्त्री (LBS Road) मार्ग रोड शो साठी बंद ठेवण्यात आला होता. याशिवाय, वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सेवाही काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. यामुळे संध्याकाळी कामावरुन घरी निघालेल्या सामान्य नोकरदारांचे प्रचंड हाल झाले होते. याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना रोड शोच्या मुद्दयावरुन कानपिचक्या दिल्या. मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं, शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबाव लागते, वाहतूक कोंडी होते. मोदींनी रोड शो घेतला होता, तो भाग प्रामुख्याने गुजराती आहे. मोदींना रोड शो करायचाच होता, तर मुंबईत मोठे रस्ते असलेला भाग होता. पण मोदींचं लक्ष्य विशिष्ट वर्ग होता. मात्र, त्यामुळे लोकांना त्रास झाला, असे शरद पवार यांनी म्हटले.
सत्तास्थापनेच्या वेळी ममता बॅनर्जी आम्हाला बाहेरुन पाठिंबा देतील: शरद पवार
ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत नसल्या तरी सत्ता स्थापनेची वेळ आली तर त्या बाहेरून समर्थन करतील. माझा त्यांच्याशी संवाद आहे, असे शरद पवारांनी सांगितले. आज त्या इंडिया आघाडीत नाही मात्र माझे त्यांच्याशी संबंध आहे. माझा स्वतः त्यांच्याशी डायलॉग आहे. ममता बॅनर्जी नक्कीच सहकार्य करतील, असे शरद पवार यांनी सांगितले.
मोदींकडे सांगायला काही उरलं नाही म्हणून विषय भरकटवण्याचा प्रयत्न: शरद पवार
पंतप्रधान मोदी यांनी कल्याणमधील सभेत भाषण करताना काँग्रेस पक्षाने हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे बजेट तयार केल्याचे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटले की, मोदींचं हे बोलणं योग्य नाही. बजेट हे कुठल्या जातीधर्माचं नसतं. देशाचे बजेट असते. मोदी बोलतात, ते कधीही होऊ शकत नाही. मोदींचा कॉन्फिडन्स ढासळला आहे. मोदींकडे काही सांगण्यासारखं शिल्लक नाही, त्यामुळे ते विषय भरकटवत आहेत. ते जे बोलत आहेत, त्यापैकी एक टक्कादेखील काही खरं नाही. जातीधर्माचा विचार करून देश चालत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
सगळे कार्यक्रम
झीरो अवर
Zero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये
Zero Hour Full | दिवाळीनंतरही जोरदार राजकीय फटाके, भुजबळ, मोदी, शाहांनी गाजवला दिवस ABP Majha
Zero Hour | महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं तर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल?
Zero Hour Guest Centre : भुजबळांच्या पुस्तकातील स्फोटक दाव्यांनी खळबळ, विद्या चव्हाण काय म्हणाल्या?
Zero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement