एक्स्प्लोर

Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड

Dharashiv School Negligence : धाराशिव जिल्ह्यातील होर्टी येथील दिव्यांग निवासी शाळेत जनावरांच्या गोठ्यात अन्नधान्य आणि गळक्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Dharashiv Residential School Mismanagement : गडचिरोली येथील आश्रमशाळेत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच, आता धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातून निवासी शाळेतील अनास्थेचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे असलेल्या दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेमध्ये (Disabled Residential School Dharashiv) विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून, संस्थाचालक आणि शाळा प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांवर नरकयातना सहन करण्याची वेळ आली आहे.

शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असतानाही या शाळेत अत्यंत बिकट आणि असुरक्षित वातावरणात दिव्यांग विद्यार्थ्यांना ठेवले जात असल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे.

Dharashiv School Shocking Realities : म्हशीच्या गोठ्यात अन्नधान्य, वर्गात सिमेंटची पोती

शाळेतील परिस्थिती अत्यंत विदारक असून विद्यार्थ्यांचे अन्नधान्य आणि जेवणाचे साहित्य जनावरांच्या गोठ्यात ठेवण्यात आले आहे. तेथे चौफेर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. ज्या वर्गखोल्यांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, त्याच खोल्यांमध्ये सिमेंटची पोती, शाळेची रद्दी आणि टाकाऊ साहित्य ठेवण्यात आले आहे. याशिवाय, वर्गखोल्यांचे छत गळके असून अत्यंत अडचणीच्या आणि अस्वच्छ वातावरणात हे विद्यार्थी राहण्यास आणि शिकण्यास मजबूर आहेत.

Dharashiv School Viral Video : ताटात अन्न नाही; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

काही दिवसांपूर्वी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटात पुरेशी अन्नाची सोय नसल्याचा आणि मुले उपाशी असल्याचा प्रकार समोर आला होता. या दिव्यांग मुलांच्या हालअपेष्टांचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी 'एबीपी माझा'ने प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाहणी केली असता, हे सर्व धक्कादायक आणि विदारक प्रकार कॅमेऱ्यासमोर उघड झाले.

Social Welfare Department Action : समाज कल्याण विभागाकडून कारवाईचे आश्वासन

या संपूर्ण गंभीर प्रकारावर जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले. संबंधित शाळा प्रशासन आणि संस्थाचालकांवर कारवाई करण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन समाज कल्याण विभागाने दिले आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
Shivsena UBT: आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget