(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour : काँग्रेसचा जाहीरनामा 'न्यायपत्र' प्रसिद्ध; 5 न्याय योजना, 25 गॅरंटींचा समावेश
Zero Hour : काँग्रेसचा जाहीरनामा 'न्यायपत्र' प्रसिद्ध; 5 न्याय योजना, 25 गॅरंटींचा समावेश
काँग्रेसने या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.. त्याला न्यायपत्र असं नाव दिलं आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, पी. चिदंबरम, सी. वेणूगोपाल यांची प्रमुख उपस्थिती होती. 'G-Y-A-N' म्हणजे ग्यान या संकल्पनेवर काँग्रेसचा जाहीरनामा आधारीत आहे. G म्हणजे गरीब, Y म्हणजे युवा, A-अन्नदाता, आणि N म्हणजे नारी ही काँग्रेसची संकल्पना आहे. या जाहीरनाम्यात युवा न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, कामगार न्याय आणि समता न्याय अशा ५ न्याय योजना आणि २५ गँरंटींचा समावेश आहे.
- प्रत्येक गरीब कुटुंबाला वर्षाला 1 लाख रुपये देणारी महालक्ष्मी योजना आणणार...
- वन नेशन-वन इलेक्शन होऊ देणार नाही..
- पक्षांतर केल्यास आमदारकी आणि खासदारकी आपोआप रद्द ठरेल अशी घटना दुरुस्ती करणार असे काही महत्वाचे आश्वासनं या जाहीरनाम्यात काँग्रेसने दिली आहेत.
या बातमीसोबत झीरो अवरमध्ये आज इथेच थांबुयात.
सोमवारी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटुयात.
पाहात राहा एबीपी माझा