Ajit Pawar : तोंडी परीक्षा, उमेदवारीची प्रतीक्षा, इच्छुकांवर प्रश्नांची सरबत्ती Special Report
Ajit Pawar : तोंडी परीक्षा, उमेदवारीची प्रतीक्षा, इच्छुकांवर प्रश्नांची सरबत्ती Special Report
महानगरपालिकांच्या निवडणुकीत एखाद्या पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते, असा प्रश्न विचारला तर त्याची खरी उत्तरं प्रत्येकाला माहित असतात. मनी, मसल आणि मँनपॉवर या त्रिसुत्रीशिवाय आजकाल निवडणुका लढणं शक्य नसल्याची जोरदार चर्चा पारापारावर रंगत असते. मात्र तरीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची कार्यकर्त्यांची इच्छा मात्र संपत नाही. अशा अनेक इच्छुकांकडून पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी अर्ज केले जातात. या अर्जांचं पुढे काय होतं, या उमेदवारांना पक्ष कुठले प्रश्न विचारतात आणि पक्ष या इच्छुक उमेदवारांकडं कसे पाहतात, याचा आढावा घेऊया, राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमधून.
पांढरा शर्ट, काळी पँट आणि हातात सोन्याचं कडं घालून खुर्चीवर बसलेल्या या व्यक्तीची सध्या मुलाखत सुरु आहे. हे आहेत नाशिकमधले भाजपच्या तिकीटासाठीचे इच्छुक उमेदवार. मुलाखतीच्या खुर्चीवर बसलेल्या या कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात नगरसेवकपदाच्या खुर्चीवर बसण्याची इच्छा आहे. मात्र त्यांची ही इच्छा पूर्ण करायची की नाही, हे ठरवण्यासाठी शहरातले प्रमुख पदाधिकारी त्यांची मुलाखत घेतायत. नाशिकमध्ये अशा अनेक इच्छुकांनी भाजप कार्यालयात गर्दी केलीय. आता तुम्ही म्हणाल, यात विशेष काय.. तर विशेष आहे या उमेदवारांना विचारण्यात येणारे प्रश्न. भाजपच्या या संभाव्य उमेदवारांना पारखून घेण्यासाठी पक्षानं तोंडी परीक्षेसाठीच्या प्रश्नांची एक भलीमोठी यादी तयार केलीय.
यादीतल्या २६ प्रश्नांपैकी हे आहेत काही निवडक प्रश्न. आजकाल पक्षाचं तिकीट मिळण्यासाठी कुठले निकष पूर्ण करावे लागतात, कुठले प्रश्न सोडवावे लागतात आणि कुठली गणितं जुळवावी लागतात, हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र तरीही मुलाखतींची ही औपचारिकता चांगलीच निरागस आणि मजेशीर ठरतेय. या मुलाखतींचा उद्देश सांगताना भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचं कन्व्हिक्शन बघण्यासारखं आहे.
All Shows































