Special Report Sameer Wankhede : समीर वानखेडेंवर सीबीआयचा गंभीर आरोप : ABP Majha
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या एनसीबीमधल्या वादग्रस्त कारकीर्दीला आणखी डागाळणारे आरोप सीबीआयनं केलेयत. कॉर्डिलिया क्रूझवरच्या ड्रग्स प्रकरणात आर्यन खानवरची कारवाई टाळण्यासाठी समीर वानखेडेंनी अभिनेता शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सीबीआयनं एफआयआरमध्ये केला आहे. त्या काळात एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक म्हणून वानखेडे यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांनी १८ कोटी रुपयांवर तडजोड केली होती असंही सीबीआयच्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयनं समीर वानखेडेंना चौकशीसाठी समन्स पाठवलंय. त्यासाठी वानखेडेंना गुरुवारी नवी दिल्लीतल्या सीबीआय कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
All Shows






























