Special Report Deepak Mankar : दीपक मानकरांवर गुन्हा दाखल का झाला? राजीनाम्यानंतर काय म्हणाले?
Special Report Deepak Mankar : दीपक मानकरांवर गुन्हा दाखल का झाला? राजीनाम्यानंतर काय म्हणाले?
दीपक मानकर पक्षाचे शहराध्यक्ष झाल्यावर त्यांच्या पुढाकाराने शंतनू कुकडे पक्षात सक्रिय झाला आणि त्याला अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष पद देण्यात आलं. * मात्र शंतनू पुण्यात गरजू मुलींसाठी हॉस्टेल चालवत होता . मात्र या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या दोन मुलींनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली . * या प्रकरणाचा तपस करताना पोलिसांना शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यात एक कोटींहून अधिक रुपयांच्या रकमेचा व्यवहार झाल्याचं आढळलं . * पोलिसांनी याबाबत दीपक मानकर यांना चौकशीसाठी बोलावलं असता दीपक मानकरने पुराव्यादाखल सादर केलेली कागदपत्रं बनावट असल्याचं पुढे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं . * त्यानंतर दीपक मानकर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय . * दीपक मानकर यांना शंतनू कुकडे आणि त्याच्या सहकार्यांनी एवढी रक्कम का दिली याचा पोलीस तपास करतायत . * दीपक मानकर आणि शंतनू कुकडे यांच्यात एक कोटी रुपयांचाच आर्थिक व्यवहार झालाय की आणखी मोठ्या रकमेचा याचा पोलीस तपस करतायत . * दीपक मानकर यांच्यावर याआधी अनेक गुन्हे नोंद असून अनेकदा वेगवगेळ्या प्रकरणात त्यांना तुरुंगवास भोगावा लागलाय .
All Shows





























