Special Report Amit Thackeray : अमित ठाकरेंचं पत्र, मनसेची भूमिका तळ्यात-मळ्यात, कार्यकर्ते संभ्रमात
Special Report Amit Thackeray : अमित ठाकरेंचं पत्र, मनसेची भूमिका तळ्यात-मळ्यात, कार्यकर्ते संभ्रमात
युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना तिरंगा यात्रा काढणे योग्य नसल्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली. याविषयी अमित ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल. या निमित्ताने मनसेच्या तळ्यात मळ्यात भूमिकेची चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली. गेल्या 15 वर्षात मनसेने बदललेल्या राजकीय भूमिकांची छबी ऑपरेशन सिंधुर बाबतच्या त्यांच्या भूमिकेमध्ये झळकत असल्याच बोलल जात. पाहूया या विषयीचा सविस्तर रिपोर्ट. भारतीय सैन्याने पाकिस्तान विरोधात. बजावलेल्या कामगिरीचा देशभरात जल्लोष सुरू असताना मनसेने मात्र पुन्हा एकदा वेगळा सूर आळवलाय. भारत-पाकिस्तान युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजय जल्लोष टाळण्याची मागणी मनसे नेते अमित ठाकरेंनी केली. ती देखील थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून. या पत्रात अमित ठाकरे म्हणतात. आपल्या सैनिकांच बलिदान, शौर्यगाथा, कुटुंबाच धैर्य हे अभिव्यक्त व्हावं. आनंददर्शक आंदोलन. विजय यात्रा समर्पक वाटत नाही. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे. समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानचा गत इतिहास बघता त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवणं कठीण आहे. नागरिकांना सजग ठेवणं युद्धजन्य स्थिती मधल्या वर्तनाच मार्गदर्शन करणं महत्त्वाचं. भारतान 6 मेच्या मध्यरात्री हवाई हल्ले करत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर काही दिवसातच राज ठाकरेंनी स्वतःून उद्धव ठाकरेंना टाळी देण्याची तयारी दाखवली होती. मात्र त्यानंतर प्रत्येक्षात ही टाळी वाजण्याच्या दिशेने सध्या तरी पावलं पडताना दिसत नाहीयेत. मनसे आगामी महापालिका निवडणुका महायुती सोबत लढवण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मनसेकडून ऑपरेशन सिंदूर आणि तिरंगा यात्रेवर आक्षेप घेतला जातोय. त्यामुळे मनसेची तळ्यात मळ्यात भूमिका कार्यकर्त्यांनाही संभ्रमात टाकत असल्याच चित्र आहे. राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जाते आणि यश संपादन करते. त्यावेळेला कोण काय बोलत याचं महत्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाच कर्तव्य आहे म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच. एकीकडे महायुतीच्या नेत्यांसोबतची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या टाळीचा फैसला आणि तिसरीकडे स्वबळावर लढण्याची तयारी या गोंधळात मन अडकल्याची चर्चा आहे. ऑपरेशन सिंधुर बाबतच्या मनसेच्या धोरणातही हाच गोंधळ डोकावत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सैन्याच्या कामगिरीचा कौतुक करताना त्यासाठी काढल्या जाणाऱ्या तिरंगा रॅलीला मात्र मनसेकडून आक्षेप घेण्यात येतोय. मनसेची ही भूमिका नागरिकांना कितपत पटते हे मात्र आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा.
All Shows































