(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Roshani Shinde Special Report : रोशनी शिंदेंवर हल्ला ते राजकीय गदारोळ, एका पोस्टवरुन 'फडतूस' राजकारण
Roshani Shinde Special Report : रोशनी शिंदेंवर हल्ला ते राजकीय गदारोळ, एका पोस्टवरुन 'फडतूस' राजकारण
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये रंगलेल्या सामनाची.... ठाण्यात
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरुन मारहाण करण्यात आली... शिंदेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंना मारहाण केल्याचा आरोप होतोय...याप्रकरणी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात रोशनी शिंदेंची भेट घेतली... त्यानंतर उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले होते. मात्र तिथे भेट होऊ शकली नाही.. यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे गृहमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार बरसले... उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार शरसंधान साधलं... राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय आणि त्यांनी राजीनामा द्यावा असं ठाकरे म्हणाले.. तर मुख्यमंत्री नव्हे गुंडामंत्री आहेत असं म्हणत शिंदेंवर निशाणा साधला... दरम्यान ठाकरेंच्या वक्तव्यावर संयमानं बोला अन्यथा पळता भुई थोडी होईल.. असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय....