MVA on EC : जनतेच्या मतांवर निवडणूक आयोगाचा दरोडा? विरोधकांचे नेमके आरोप काय? Special Report
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते अजूनही पराभव मानायला तयार नसल्याचं दिसतंय. या पराभवाचं खापर आधी ईव्हीएमवर फोडल्यानंतर आता मविआच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. मविआकडून थेट निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेविषयी संशय उपस्थित केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचं वादळ उठलंय. पाहूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट...
आधी ईव्हीएम... आ आता निवडणूक आयोग...
विधानसभा निवडणूक निकालानंतर पराभूत महाविकास आघाडीनं
ईव्हीएमनंतर आपला मोर्चा आता निवडणूक आयोगाकडे वळवलाय...
आणि थेट आयोगाच्या व्यवस्थेवरच संशय व्यक्त केलाय...
विरोधकांचा आरोप आहे की...
- निवडणूक आयोगानं जनतेच्या मतांवर दरोडा टाकलाय
- झालेलं मतदान आणि आयोगाचे आकडे यात तफावत आहे
- मतदानादिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतांची टक्केवारी कशी वाढली?
- मतदारांची गर्दी वाढली असेल तर त्याचं सीसीटीव्ही फुटेज आयोगानं प्रसारित करावं
- मतदानानंतर आयोगानं पत्रकार परिषद का घेतली नाही?
असे अनेक मुद्दे उपस्थित करुन
विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय...
आपला मुद्दा पटवून देण्यासाठी नाना पटोलेंनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या पतीच्या व्हीडिओचा आधार घेतला
याचदरम्यान जितेंद्र आव्हाडांनीही एक ट्विट करत मोठा बॉम्ब फोडला...
या प्रकरणावर आज रोहित पवारांनीही भाष्य केलं...
विरोधकांच्या या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी अजित पवार समोर आले...
आणि त्यांनी मतदानाला झालेली गर्दी, वाढलेलं मतदान यावर स्पष्टीकरणच दिलं...
२३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला...
त्याला आज पाच दिवस उलटून गेले आहेत...
विरोधक पराभव स्वीकारायला अजूनही तयार नाहीत...
आधी ईव्हीएमवर खापर फोडलं... आता थेट निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं जातंय...
पण निवडणूक आयोग बोली आरोपांवर उत्तर देणार नाहीय..तर त्यांना लेखी तक्रारीची प्रतीक्षा आहे
आता विरोधकांच्या आरोपांची कोणत्या पातळीवर आणि कितपत दखल घेतली जातेय पाहुयात
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा