MVA on Result :ठाकरेंच्या सेनेचे काँग्रेसवर प्रहार;MVA तुटणार? ठाकरेंचा वेगळा निर्णय? Special Report
विधानसभेत महायुतीच्या त्सुनामीत मविआचा पालापाचोळा झाला...तिन्ही पक्ष मिळून ५० चाही आकडा गाठण्यात अपयशी ठरलेल्या मविआत पराभवाचं चिंतन सुरू आहे. काँग्रेसनं एकीकडे ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारलाय...तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेेनेनं मात्र पराभवाचं खापर चक्क काँग्रेसवर फोडायला सुरुवात केलीय...ज्या काँग्रेसमुळे लोकसभेत चांगल्या जागा मिळाल्या, तीच काँग्रेस आता ठाकरेंच्या सेनेला नकोशी का वाटू लागलीय...पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...
घसा कोरडा पडेपर्यंत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मित्र पक्षांना सांगत होते...
पण कुणी ऐकलंच नाही..
निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या मागणीकडे कानाडोळा करण्यात आला..
मविआचं नेमकं इथेच चुकलं राव...
असं आम्ही नाही तर तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणताहेत...
विधानसभेत चार जागा जास्त जिंकणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं, काँग्रेसनं निवडणुकीसाठी आखलेल्या रणनीतीचं पोस्टमार्टम करायला सुरुवात केलीय..
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी ठाकरेंकडून केली जात होती..
मात्र काँग्रेसमधल्या अनेकांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागल्यानं अपयश पदरी आलं, असा निष्कर्ष अंबादास दानवेंनी काढलाय
ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेसं मविआ म्हणून विधानसभा लढली..
तिन्ही पक्षांना एकत्र मिळून ५० जागांचाही आकडा गाठता आलेला नाहीय..
या पराभवाचं विश्लेषण करताना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक आयोग आणि ईव्हीएमला जबाबदार धरलंय
मात्र एकटी ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या नावानं बोट मोडतेय..
त्यामुळे मविआ फुटीच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय..
मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केलेला हा प्रश्न, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अभय मिळालेल्या नाना पटोलेंच्या लेखी चिल्लर आहे...
काँग्रेस आणि ठाकरेंच्या भानगडीत आपणं कशाला पडायचं असा पवित्रा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतलेला दिसतोय
तिकडे पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांनी आणि आत्ताच्या राजकीय वैऱ्यांनी ठाकरेंना सल्ले द्यायला आणि टोमणे मारायला सुरूवात केलीय
अंबादास दानवेंनी केलेल्या टीकेचं उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंनी खंडन केलेलं नाही
त्यामुळे काँग्रेसला आत्मविश्वास नडला, काँग्रेसच्या नेत्यांनी पाहिलेली मुख्यमंत्रिपदाची स्वप्न नडली... या सगळ्या टीकेला ठाकरेंची मान्यता आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय...
आणि या प्रश्नाचं उत्तर होकार्थी असेल तर काँग्रेसची आणि शरद पवारांची भूमिका काय असणार?
या प्रश्नाच्या उत्तरावर मविआची दशा आणि दिशा ठरणार आहे...
ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई