Rajan Salvi : शिंदेंचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा कोकणातील वाघ गळाला Rajkiya Sholay Special Report
मी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत कार्यकर्ता.... कधीच ठाकरेंना सोडणार नाही असं म्हणणाऱ्या रत्नागिरीच्या राजन साळवींनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. सत्तासंघर्षाच्या काळात एकनाथ शिंदेंची ऑफर धुडकावून ठाकरेंसोबत ठाम राहिलेल्या राजन साळवींनी आज हे पाऊल का उचललं? त्यांच्या या निर्णयाने रत्नागिरीच्या राजकारणात कोणतं वादळ येणार ? पाहूयात, या साऱ्याचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट
कोण आहेत राजन साळवी?
शिवसेनेचा हाडाचा कार्यकर्ता म्हणून राजन साळवींची ओळख. एकसंध शिवसेनेत असलेले साळवी रत्नागिरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. शिवाय, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख म्हणून देखील राजन साळवी यांनी काम केले आहे. आतापर्यंत पाच वेळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले साळवी हे 2009, 2014 आणि 2019 असे सलग तीन वेळा आमदार आमदार राहिले आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी पराभव केला.
पक्ष बदलाची भूमिका का घेतली?
विधानसभा निवडणुकीत स्वपक्षातील नेत्यांनी, काही प्रमुख कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले. त्यामुळे पराभव झाला अशी राजन साळवी यांची भावना. याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील तक्रार मांडली. पण, अपेक्षित असा निर्णय झाला नाही. त्यामुळे साळवी नाराज झाले. शिवाय, एसीबीचा सेसेमिरा देखील साळवी आणि कुटुंबियांच्या मागे आहे. दरम्यान, विधानसभा निकालानंतर मोठ्या प्रमाणात उबाठाचे कार्यकर्ते शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. तर, दुसरीकडे साळवी समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षांतरासाठी साळवी यांच्यावर दबाब आण
ला. सत्तेत गेल्यास कार्यकर्त्यांना देखील फायदा होईल. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सत्तेचा लाभ मिळेल हि देखील कार्यकर्त्यांची भावना झाली. शिवाय, पक्षांतर्गत गटबाजी, स्थानिक राजकारण, वरिष्ठांनी अपेक्षित अशी दखल न घेणे यामुळे साळवी नाराज झाले.
All Shows

































