IAS Fake Officer : बोगस IAS अधिकाऱ्यांच्या जाळ्यात बडे मासे Chhatrapati Sambhajinagar Special Report
IAS Fake Officer : बोगस IAS अधिकाऱ्यांच्या जाळ्यात बडे मासे Chhatrapati Sambhajinagar Special Report
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका तोतया महिला अधिकाऱ्याला अटक केली. कल्पना भागवत नावाच्या याच महिलेच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येतायत. व्हिसा, बदलीसंदर्भातली कामं अशी अनेक कामं करुन देतो असं सांगून महिलेनं अनेकांना गंडा घातला. त्यात अनेक नेते आणि नामवंत लोकही आहेत.... काय आहे हे नेमकं प्रकरण? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट....
संभाजीनगर पोलिसांनी अटक केलेली
आणि आयएएस अधिकारी म्हणून बतावणी करणारी
ही आहे कल्पना भागवत...
पोलीस तपासात या महिलेचे अनेक कारनामे समोर आले....
व्हिसा,
बदलीसंदर्भातली कामं...
पद्मश्री पुरस्कार मिळवून देण्याचं आमिष
राज्यसभेत खासदारकी
अशी अनेक आश्वासनं देत या महिलेनं
अनेकांना गंडा घातला...
धक्कादायक बाब म्हणजे यात अनेक नेतेमंडळी आणि नामवंत लोकांचा समावेश आहे...
छत्रपती संभाजीनगरच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये
तब्बल सहा दिवस या महिलेचा मुक्काम होता
त्यामुळे ही महिला पोलिसांच्या रडारवर आली...
All Shows

































