Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
एकीकडे एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे गणेश नाईक... एक ठाण्याचा तर दुसरा नवी मुंबईचा वाघ... खरं तर गणेश नाईकांनी ठाण्यात ठाण मांडून एकनाथ शिंदेंना उघड उघड आव्हान द्यायला सुरूवात केली होती... मात्र म्हणतात ना, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी... एकनाथ शिंदेंनी देखील नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं नाईकांसमोर कडवं आव्हान उभं केलंय.. आता या दोन वाघांच्या झुंजीत कोण राहणार आणि कुणाला जंगल सोडावं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे..
डोक्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात लाभलेल्या गणेश नाईकांनी , वर्षभरापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे....
नवी मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असल्यानं, नाईक विरूद्ध शिंदेंमधला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय..
आणि त्याचा प्रत्यय प्रचारसभांमधून येतोय..
नगरविकास खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे...
आणि या खात्यानं नवी मुंबईची वाट लावल्याचा आरोप गणेश नाईकांना केलाय...
तर एवढी वर्षे नवी मुंबईत कुणाची सत्ता होती असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदेंनी पलटवार केलाय
भाजपची सत्ता आली तर गेल्या काही वर्षातला टेंडरचा हिसाब किताब समोर आणू, असा इशारा देतानाच शिंदेंनी नवी मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी केल्याचा आरोप गणेश नाईकांनी केलाय..
युनिफाईड डीपीआरवरून देखील गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये सामना रंगलायआता नवी मुंबईच्या मतदारांना कुणामध्ये विकास पुरूष दिसतोय?
गणेश नाईकांमध्ये की एकनाथ शिंदेंमध्ये...?
हे निकालानंतरच कळणार आहे
All Shows

































