Chay Wale Baba | 41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report
महाकुंभ मेळाला सुरुवात झालेली आहे आणि महाकुंभ मेळाव्यात अनेक साधूंची मानद्याळी पाहायला मिळते. उद्यापासून या कुंभमेळाला त्याच्या शाही परवाला सुरुवात होत असून याच मेळाव्यात एक चायवाले बाबांची देखील मोठी चर्चा आहे. या बाबांनी गेल्या 41 वर्षांपासून मौनव्रत धारण केलय पाहूया. विद्युत रोषणाईन उजळलेला... प्रयागराजचा त्रिवेणी संगम देशाच्या कानाकोपऱ्यातून साधू प्रयागराज मध्ये दाखल होऊ लागले. याच कुंभमेळ्याच प्रमुख आकर्षण आहे ते म्हणजे देशाच्या अनेक भागातून आलेले साधू महंत. याच कुंभमेळ्यात आम्हालाही एक बाबा भेटले.
या बाबांच नाव आहे चायवाले बाबा. तसं यांच खरं नाव दिनेश स्वरूप आहे पण प्रयागराज मध्ये त्यांना चायवाले बाबा या नावान ओळखतात. चाय वाले बाबांनी गेल्या 41 वर्षांपासून मौन व्रत धारण केलाय.
हे देखील वाचा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवर (Walmik karad) 302 चा गुन्हा दाखल करावा, तसेच मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. तसेच, सीआयडी पोलिसांकडून तपासाबाबत आम्हाला माहिती दिली जात नाही, योग्य दिशेने तपास सुरू आहे का, हेही आम्हाला समजत नाही. माझ्या भावाप्रमाणेच माझ्याही जिवाला धोक आहे, मग मीच स्वत:ला संपवून घेतो, असे म्हणत धनंजय देशमुख यांनी मस्साजोग गावातील टाकीवर चढून आज आंदोलन केले. अखेर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीनंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त मस्साजोग गावात पाहायला मिळाला. तर, बीडचे (Beed) पोलीस अधीक्षक नवनीत कावत हेही गावात आले होते. पत्रकारांनी त्यांच्यासोबत संवाद साधला असता खंडणीतील आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करण्याबाबत थेट उत्तर देणं त्यांनी टाळलं.