एक्स्प्लोर

धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई

BEST Bus : मागील 5 वर्षात बेस्ट बसचे (BEST Bus) तब्बल  834 अपघात घडल्याची माहिती देत यात 88 नागरिकांची जीवितहानी झाल्याची कबूली बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

मुंबई : मागील 5 वर्षात बेस्ट बसचे (BEST Bus) तब्बल  834 अपघात घडल्याची माहिती देत यात 88 नागरिकांची जीवितहानी झाल्याची कबूली बेस्ट प्रशासनाने दिली आहे. यात मृत्युमुखी आणि जखमी नागरिकांना 42.40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई दिली गेली असल्याची माहिती ही पुढे आली आहे. तर 14 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे आणि 24 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती बेस्ट प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे मागील 5 वर्षात घडलेल्या अपघाताची, जीवितहानी आणि आर्थिक नुकसानभरपाईची माहिती विचारली होती. बेस्टचे वरिष्ठ वाहतुक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी अनिल गलगली यांस मागील 5 वर्षांची सविस्तर माहिती दिली. यात मागील 5 वर्षात 834 बेस्ट बस अपघात झाले असून यात बेस्ट आणि खाजगी कंत्राटदार यांचा समावेश आहे. बेस्टचे 352 अपघात असून यात जीवितहानीची संख्या 51 आहे.  तर खाजगी कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या 482 अपघातात 37 जीवितहानी झाली आहे. वर्ष 2022-23 आणि वर्ष 2023-24 मध्ये सर्वाधिक प्रत्येकी 21 जीवितहानी झाली आहे. 

 5 वर्षांत अपघातग्रस्तांना 42.40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई

मागील 5 वर्षांत मरणांकत आणि जखमी यास 42.40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आली असून 494 प्रकरणे होती. यात सर्वाधिक रक्कम ही वर्ष 2022-23 यात देण्यात आली. त्यावर्षी 107 प्रकरणात सर्वाधिक आर्थिक नुकसान भरपाई रक्कम 12.40 कोटी इतकी आहे. वर्ष 2019-20 मध्ये 9.55 कोटी, वर्ष 2020-21 मध्ये 3.44 कोटी, वर्ष 2021-22 मध्ये 9.45 कोटी, वर्ष 2023-24 मध्ये 7.54 कोटी ही आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम आहे.

12 बडतर्फ आणि 24 निलंबित झाले कर्मचारी

मागील 5 वर्षांत प्राणातंक अपघातात कर्मचारी बडतर्फ संख्या 12 आहे आणि वैयक्तिक इजा प्रकरणात 2 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. वैयक्तिक इजा प्रकरणात 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्य कारवाईत ताकीद, समज, सक्त ताकीद, वसुली, द्वंद्वतन श्रेणीत कपात, अशी कारवाई करण्यात आली आहे. ही आकडेवारी बेस्ट प्रशासनाची सुरक्षिततेची जबाबदारी अधोरेखित करते. यावरून प्रशासन आणि कर्मचार्‍यांकडून अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता स्पष्ट होते, असे अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.

राज्यात वाढलेल्या अपघातांवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील परिवहन क्षेत्राला राज्याला सुरक्षित, सुंदर आणि  शाश्वत ठेवण्यासाठी पुढील 3 वर्षात नवीन ई.व्ही.पॉलिसी घोषित करण्याकरण्याबरोबरच 15 वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे (Road Accident) प्रमाण करण्यासाठी ए.आय.चा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा. त्याचबरोबर घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर इंजिनियरिंग सोल्यूशन शोधून काढावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्या.

हेही वाचा:

AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
Ratnagiri : रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
Ratnagiri : रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Embed widget