Ajit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial Report
अजितदादा... सडेतोड... परखड आणि रोखठोक बोलतात तर कधी मिष्कीलपणे चिमटेही काढतात... पण गुलाबी जॅकेट त्यांच्या अंगावर आलं आणि त्यांच्या बोलण्यातही थोडासा सावधपण आला... अर्थात हा बदल का झाला? याबाबत अनेक चर्चा रंगतायत... मात्र आता हेच दादा स्वत:च्या तोंडाने आपण नम्र झाल्याचं सांगतायत... आणि तसं सांगताना ते पत्रकारांनाच उपदेशाचे डोसही देतायत... पाहूयात...
सध्या अजितदादांना हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे महायुतीचं जागावाटप
चर्चा सुरूय, लवकरच जागावाटप होईल असं अजितदादांचं ठरलेलं उत्तर...
मात्र आज अजित पवारांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये जागावाटपाच्या प्रस्नाचा चेंडू टोलवला
लोकसभेतल्या मोठ्या अपयशानंतर विधानसभेला सामोरं जाताना
अजित पवारांनी अनेक बदल स्वीकारले आहेत..
मात्र हे बदल अजितदादांच्या मूळ व्यक्तिमत्वाला फारसे सूट होत नाही असं उघड आणि दबक्या आवाजात
ऐकायला मिळतं..
कदाचित म्हणूनच अजितदादांना स्वतःहून सांगावं लागतंय