Majha Katta With Nana Patole : जनतेच्या कोर्टात जनता नापास : नाना पटोले : ABP Majha
काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कट्ट्याचे पाहुणे आहेत. नाना बऱ्याचदा गरज नसतानाही प्रवाहाच्या विरुद्ध पोहत राहतात, असं त्याचे हितचिंतक विरोधक सगळेच मानतात ..आधी ते अपक्ष होते तेव्हा ही ते नाराज होते मग भाजपमध्ये गेले, खासदार बनले... सगळं सुरळीत सुरु आहे असं वाटत असतानाच ते थेट मोदींवर नाराज होऊन 'महाशक्ती'ची साथ सोडून बाहेर पडले. सध्या परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचे काही नेते नानांवर नाराज असतात तर कधी नाना काही काँग्रेसच्या नेत्यांवर नाराज असतात त्यातूनच ते छत्रपती संभाजीनगर च्या वज्रमुठ सभेला हजर राहिले नव्हते अशा चर्चाही रंगल्या..
आता काही तासातच नागपुरात वज्रमुठ सभा होतेय त्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका जाणून घेण्यासोबतच महविकास आघाडीत काँग्रेस खरंच कंफर्टेबल आहे का? सावरकरांच्या टिकेवरून ठाकरेंची नाराजी काँग्रेस ला परवडणारी आहे का? खरंच सत्ताधारी सतत दावा करत असल्या प्रमाणे काँग्रेस चे जुने जाणते नेते भाजपा च्या वाटेवर आहेत का? थोडक्यात राज्यात काँग्रेस च चाललंय काय याविषयी नाना पटोले यांच्याशी संवाद