Medha Patkar in Majha Katta:अन्यायग्रस्तांसाठी लढणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर माझा कट्ट्यावर
देशातील सर्वाधिक चर्चेतल्या आंदोलनापैकी एक म्हणजे नर्मदा बचाव आंदोलनचा गेली जवळपास 35 वर्षे चेहरा असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्याशी आज आपण माझा कट्ट्यावर गप्पा मारणार आहोत. अन्यायग्रस्तांसाठी उठणारा जोरदार आवाज यामुळे मेधाताई देशातील कानाकोपऱ्यातील अन्यायग्रस्तांना त्याच्या मसिहा वाटतात. मेधाताईंच्या आजच्या आयुष्यावर त्यांच्या लहानपणीचा खूप प्रभाव आहे. त्यांचे वडील वसंतराव खानोलकर मुंबईत कामगार सेनेत सक्रीय होते. आंदोलनं , खलबतं, चर्चा या मेधाताईंच्या घरी रोजचं होत असे. त्यामुळे लहाणपणी काही समजत नसलं तरी अन्यायाविरोधात आवाज उठवणं हे त्याच्या मनात कायम होतं. हाच मार्ग मेधाताईंनी मोठेपणी निवडला. देशातील विस्थापीतांचा आवाज बनलेल्या आणि आदिवासी भागातील बांधवांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मेधा पाटकर यांचा आजवरचा प्रवास आणि वेगवेगळ्या आंदोलनांवेळी त्यांना आलेल्या अनुभवांवर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.