Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime News : पुण्याच्या बिबवेवाडी भागातील एका बारमधील कर्मचाऱ्यांनी दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Pune Crime News : गेल्या काही सिव्संपासून पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटनांमध्ये वाद झाली आहे. आता पुन्हा पुण्याच्या बिबवेवाडी (Bibwewadi) भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. बारमधील कर्मचाऱ्यांकडून दोन तरुणांना काठी, दांडके आणि बांबूने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 21) रात्री 12 वाजेच्या सुमारास पुण्यातील बिबवेवाडी परिसरात असणाऱ्या एका बारमध्ये तीन तरुण दारू पिण्यासाठी गेले होते. दारूच्या नशेत असल्याने त्यांनी बारमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. बारचे नुकसान होईल, यासाठी बारमधील कर्मचाऱ्यांनी त्या तरुणांना तिथून बाहेर काढण्यास सुरुवात केली.
दोन तरुण गंभीर जखमी
यावेळी कर्मचार्यांनी तरुणांना बेदम मारहाण केली. मारहाण करताना कर्मचाऱ्यांनी लाठ्या, काठ्या, दांडके तसेच धारधार शस्त्राचा वापर सुद्धा केला. या मारहाणीत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
बिबवेवाडीत महिला डॉक्टरची आत्महत्या
दरम्यान, बिबवेवाडीतील एका 25 वर्षीय महिला डॉक्टरने क्लिनिकमध्येच विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात 25 वर्षीय डॉक्टर पल्लवी पोपट फडतरे हिची मॅट्रीमोनिअल साईटवरून कुलदीप आदिनाथ सावंत या तरुणाशी ओळख झाली होती. यानंतर तरुणाशी महिला डॉक्टरची मैत्री झाली. काही काळाने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर पल्लवीने कुलदीपला 10 लाख रुपये दिले होते. 10 लाख रुपये मिळताच कुलदीपनं आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. लग्नाची विचारणा करताच टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. नंतर आपले लग्न झाल्याची कबुली देत त्याची बायको गर्भवती असल्याचे कुलदीपने पल्लवीला सांगितले. डॉक्टर असलेल्या पल्लवीला हा मानसिक धक्का सहन झाला नाही आणि तिने क्लिनिकमध्येच विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कुलदीप आदिनाथ सावंतवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले