एक्स्प्लोर

Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी $TRUMP मीम कॉईन आणि  $MELANIA मीम कॉईन लाँच केले होते. 

न्यूयॉर्क : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार काल स्वीकारला. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. तर, मेक्सिको आणि कॅनडावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय देखील ट्रम्प यांनी घेतला. याशिवाय अमेरिकेत जन्म झालेल्या प्रत्येक व्यक्तीला नागरिकत्व मिळणार नाही, यासह इतर निर्णय ट्रम्प यांनी घेतले आहेत. अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये दोन कॉईन जारी केले होते. $TRUMP मीम कॉईन आणि $MELANIA मीम कॉईन जारी केले होते. ट्रम्प यांना एक निर्णयाचा फटका बसल्यानं त्यांनी 7.5 अब्ज डॉलर्स गमावले. 

नेमकं काय घडलं?

मेलेनिया ट्रम्प यांनी $MELANIA मीम कॉईन जारी केलं होतं. हे कॉइन 19 जानेवारीला लाँच करण्यात आलं होतं. $MELANIA मीम कॉईन लाँच होताच ते 24000 टक्केंच्या तेजीसह 13 डॉलरपर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळं त्याचं बाजारमूल्य  13 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक झालं होतं. मेलेनियानं ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन लाँचिंग संदर्भातील घोषणा केली होती आणि व्यापाऱ्यांना खेरीदंच आवाहन केलं होतं. 

$MELANIA  मीम कॉइन लाँच झाल्यानंतर $TRUMP मीम कॉइनला मोा फटका बसला. डोनाल्ड ट्रम्प यांचं $TRUMP मीम कॉइन लाँचिंगनंतर जोरदार चर्चेत होतं. त्याच्या किमतीत 300 टक्क्यांची वाढ झाली होती.  त्याचं बाजार मूल्य 14 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलं होतं. मात्र, मेलेनिया यांचं मीम कॉइन लाँच झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मीम कॉइनमध्ये 50 टक्के घसरण झालीय.  


रिपोर्टनुसार $MELANIA मीम कॉइन लाँच झाल्यानंर $TRUMP मीम कॉइनमध्ये 10 मिनिटांमध्ये घसरण झाली. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यामुळं साधारणपणे 7.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची घसरण झाली. गुंतवणूकदारांनी मेलेनिया ट्रम्प यांच्या मीम कॉइनला प्राधान्य दिलं. 

क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करताना सावधानता महत्त्वाची

क्रिप्टो करन्सीचा बाजार अस्थिर असतो. जेव्हा नवी क्रिप्टोकरन्सी लाँच होते तेव्हा बाजारातील इतर घटकांवर परिणाम होई शकतात. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार  #MELANIA मीम कॉइनकडून #TRUMP मीम कॉइनला  आव्हान मिळू शकतं. 

मेलेनिया ट्रम्प यांनी त्यांच्या मीम संदर्भात भाष्य केलं होतं, त्या म्हणालेल्या की हे फक्त मजेशीर पाऊल नाही, ही माझ्या संमर्थकांसाठी नवी संधी आहे. लोकांनी या क्रिप्टोकरन्सीचा भाग व्हावं, त्याला स्वीकारावं, असं वाटत असल्याचं मेलेनिया ट्रम्प म्हणाल्या. यानंतर $MELANIA मीम कॉइनची खरेदी वाढली. 

इतर बातम्या :   

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget