एक्स्प्लोर

Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला

bhandup dreams mall: भांडूप येथील ड्रीम्स मॉलमध्ये मंगळवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह सापडला. बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात हा मृतदेह तरंगत होता.

मुंबई: मुंबई उपनगरातील भांडुप परिसरात असणाऱ्या ड्रीम्स मॉलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये  मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. या महिलेच्या अंगावर गुलाबी रंगाचा ड्रेस आणि पांढरी ओढणी होती. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, ड्रीम्स मॉलमध्ये (Dreams Mall) मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, भांडुप (Bhandup News) पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रीम्स मॉल बेसमेंट या ठिकाणी पाण्यात एक अनोळखी महिला वय वर्ष 30 ते 35 हिचा 09.40 चे सुमारास मृतदेह मिळून आला आहे. सदरचा मृतदेह मुलुंड जनरल हॉस्पिटल याठिकाणी भांडुप वन मोबाईलच्या मदतीने  पाठवण्यात आला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेणे चालू आहे.  

भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या ड्रीम्स मॉल गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास बंद पडलेल्या अवस्थेत आहे. या मॉलमध्ये मोजकीच दुकाने आणि कॉल सेंटर उरले होते. पावसाळ्यात या मॉलमध्ये चहुबाजूंनी पाणी शिरते. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांनी या मॉलमधून काढता पाय घेतला होता. त्यानंतर या मॉलमध्ये काही कंपन्यांची कार्यालये आणि मोजकी दुकाने उरली होती. त्यामुळे या मॉलमध्ये लोकांची फारशी ये-जा नव्हती. मध्यंतरी ड्रीम्स मॉलमध्ये असलेल्या एका रुग्णालयाला भीषण आग लागली होती. त्यामुळे येथील रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते. तेव्हापासून ड्रीम्स मॉलची संपूर्ण रया गेली होती. अशात या मॉलमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. ही महिला नेमकी कोण होती, ती याठिकाणी कशासाठी आली होती, तिचा मृत्यू कसा झाला, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. याबाबत आता पोलीस तपासातून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

मॉल बंद असल्यामुळे काही तरुण-तरुणी बंद मॉलच्या आत जाऊन गैरफायदा घेतात. तसेच काही समाजकंटकही आत बसलेले असतात, असे स्थानिकांकडून सांगितले जाते. स्थानिकांनी अनेकदा ड्रीम्स मॉलमधील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून त्याबाबत कोणतीही ठोस पावले  उचलण्यात आली नव्हती.

आणखी वाचा

बीडमध्ये मुलीचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू; डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका

महत्त्वाच्या बातम्या

Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget